आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान, पालघर, महाराष्ट्र

संस्था नोंदणी क्रमांक: पालघर/००००२६/२०२४

आदिवासी कोकणा समाज सामाजिक बांधिलकी
जोपासत सशक्तीकरणाकडे

आदिवासी कोकणा जमातीचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, सांस्कृतिक संवर्धन, कुलाचार पालन या प्रमुख उद्देशाने आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान समाजाचे उज्वल भविष्य घडविण्यास कटिबद्ध आहे.

Adivasi Dance 1
Adivasi Dance 2
Adivasi Dance 3
Adivasi Dance 4
Adivasi Dance 5
Adivasi Dance 1
Adivasi Dance 2
Adivasi Dance 3
Adivasi Dance 4
Adivasi Dance 5
Icon
Icon
Icon
Adivasi Kokna Tribe

आदिवासी कोकणा जमात

आदिवासी कोकणा जमात हा महाराष्ट्र, गुजरात व दादरा–नगर हवेलीमध्ये वास्तव्यास असलेला एक महत्त्वाचा आदिवासी समुदाय आहे. प्राचीन व समृद्ध वारसा, सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि निसर्गाशी असलेले घट्ट नाते हि या समाजाची खरी ओळख आहे.

या वारशाचे जतन व संवर्धन करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यासाठी आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान, पालघर ची स्थापना करण्यात आली आहे. हि संस्था २२ एप्रिल २०२४ रोजी सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत झाली असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासासाठी एक विश्वासार्ह मंच आहे.

आधुनिक शिक्षण व नव्या संधी स्वीकारताना आपली भाषा, संस्कृती व परंपरा जपणे तितकेच आवश्यक आहे. परंपरा आणि प्रगती यांचा समन्वय साधत समाजात एकता निर्माण करणे आणि पुढील पिढीसाठी उज्ज्वल भविष्य घडविणे हाच आमचा उद्देश आहे.

संदेश:

परंपरेचा सन्मान राखत सर्वांगीण विकास साधणे आणि सशक्त, स्वाभिमानी व संघटित समाज घडविणे हाच आमचा वारसा आणि संकल्प आहे.

आमचे सामाजिक उपक्रम

समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व सामाजिक उन्नती करण्यासाठी खालील उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.

hand

सामाजिक दायित्व निधी संकलन

सामाजिक कार्यक्रम निरंतर सुरू राहावेत व समाजातील गरजवंतांना मदत करता यावी या उद्देशाने सुरू केलेला समाज हिताचा उपक्रम.

shabha

मासिक सभा व अहवाल वाचन

प्रतिष्ठान विषयी असणारा समाज बांधवांचा विश्वास व निष्ठा कायम टिकून राहावी यासाठी मासिक सभा व नियमित अहवाल वाचन केले जाते.

advocate

कायद्याची कार्यशाळा

समाजातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकार व हक्कांची जाणीव, जागरूकता व्हावी यासाठी वेळोवेळी कायद्याची कार्यशाळा म्हणून शिबीर घेतले जाते.

icon

आमची संस्कृती

कोकणा समाजाची संस्कृती चालीरीती, रूढी परंपरा, बोलीभाषा, कुळाचार याची भावी पिढीला ओळख व्हावी व संस्कृती टिकावी या करिता मुलांसाठी वर्षातून एकदा एक दिवसीय उपक्रम आयोजन करणे. कोकणा समाज संस्कृती टिकुन रहावी या करिता महासंमेलनाचे आयोजन केले जाते.

education

शैक्षणिक उपक्रम

  • मिशन नवोदय/एकलव्य.
  • इ.१० वी व इ. १२ वी नंतर काय? (करियर मार्गदर्शन शिबीर).
  • इ. १० वी व इ. १२ वी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम.
  • JEE/NEET तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप.
  • अनाथ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत.
  • अभ्यासात अभ्यासावाका.
  • सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, माण, ता. विक्रमगड.
icon

शेतकरी शिबीर

पारंपारिक शेतीला आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकरी प्रगतशील व्हावेत या करिता वेळोवेळी शेतकरी शिबिराचे आयोजन केले जाते.

Vision Icon

आमची दृष्टी

शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि एकतेच्या बळावर आदिवासी कोकणा समाजाची सर्वांगीण प्रगती व सशक्तीकरण करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक व्यक्तीला समान संधी, आत्मविश्वास आणि स्वावलंबन प्राप्त व्हावे, तसेच आधुनिक प्रगतीच्या वाटेवर चालत असताना आपल्या सांस्कृतिक मुळांशी, परंपरा, भाषा आणि मूल्यांशी घट्ट नाते टिकून राहावे, असे एक उज्ज्वल, सशक्त आणि एकत्रित भविष्य घडवण्याचा आमचा संकल्प आहे.
Goal Icon

आमचे ध्येय

  • शिक्षण आणि सामाजिक विकासाला पाठबळ देणे.
  • नोंदणी व सर्वेक्षणांच्या माध्यमातून समाजाची सांख्यिकी माहिती संकलन करणे.
  • आदिवासी संस्कृती आणि परंपरांचे जतन करणे.
  • विश्वासार्ह व मजबूत सामुदायिक मंच उभारणे.
  • युवक व युवतींना कौशल्य विकास आणि नेतृत्वासाठी सक्षम बनवणे व स्वयंरोजगार निर्माण करून देणे.
  • समाजात एकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना बळकट करणे.

मुख्य पदाधिकारी

समाजाच्या प्रगतीसाठी निस्वार्थपणे कार्य करणारे समर्पित व्यक्तिमत्व.

श्री. श्री. संदीप रामु साठे

श्री. श्री. संदीप रामु साठे

अध्यक्ष

श्री. राहुल गणपत धुम

श्री. राहुल गणपत धुम

उपाध्यक्ष

श्री. भगवान हरजी भुसारा

श्री. भगवान हरजी भुसारा

उपाध्यक्ष

श्री. योगेश रघुनाथ भोये

श्री. योगेश रघुनाथ भोये

सचिव

श्री. सुनिल दिनकर बोरसे

श्री. सुनिल दिनकर बोरसे

खजिनदार

श्री. यदुनाथ सीताराम भोये

श्री. यदुनाथ सीताराम भोये

सह सचिव

श्री. प्रभाकर जानु भुसारा

श्री. प्रभाकर जानु भुसारा

सहखजिनदार

कार्यकारी मंडळ सदस्य

श्री. रविंद्र रघुनाथ महाकाळ

कार्यकारी सदस्य

श्री. बिपीन धाकल जाधव

कार्यकारी सदस्य

श्री. गोविंद रावळ गावित

कार्यकारी सदस्य

श्री. कमळाकर नाऊ कुवरे

कार्यकारी सदस्य

श्री. कमळाकर महादु धुम

कार्यकारी सदस्य

श्री. जगन्नाथ लक्ष्मण गवळी

कार्यकारी सदस्य

श्री. गोविंद अवतार

कार्यकारी सदस्य

श्री. श्रीकांत निकुळे

कार्यकारी सदस्य

श्री. सदाशिव पवार

कार्यकारी सदस्य

श्री. वसंत शिंदे

कार्यकारी सदस्य

श्री. सुनिल भुसारा

कार्यकारी सदस्य

श्री. देवराम गावित

कार्यकारी सदस्य

श्री. श्री. भांजी कुरकुटे

कार्यकारी सदस्य

श्री. रामु थोरात

कार्यकारी सदस्य

mobileapp

आदि कोकणा विवाह

कोकणा समाजातील युवक/युवतींना आपला योग्य जोडीदार निवडण्यासाठी या ॲप द्वारे योग्य जोडीदार निवडीचा मंच स्थापन करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत दोन कुटुंबांना एकत्र जोडणारा हा मंच विवाहाच्या प्रवासाला योग्य दिशा देत आहे.

नोंदणी शुल्क (Registration Fee)

आदि कोकणा विवाह ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी एकदाच ₹500 शुल्क आकारले जाते.

  • प्रोफाइल तयार करणे
  • समितीकडून पडताळणी प्रक्रिया
  • समाजातील सदस्यांशी संपर्क सुविधा
  • विवाह जुळवणी सेवा

नोंद: प्रोफाइल मंजूर झाल्यानंतर नोंदणी शुल्क परत मिळणार नाही.

सेवा कशी कार्य करते?

  1. मोबाइल ॲप डाउनलोड करा
  2. आपली माहिती भरा
  3. नोंदणी शुल्क भरा
  4. समितीकडून पडताळणी
  5. योग्य जोडीदार शोधा
tick
person tick
Screen 1 Screen 2